गोष्ट आहे २०१९ सालची. India आणि England यांच्यामधील दुसरी कसोटी संपलेली. यात भारताने इंग्लंडचा साफ 322 धावांनी पराभव केलेला. रविचंद्रन अश्विन याने घरच्या मैदानावर अप्रतिम कामगिरी केली. अश्विन आणि भारतीय गोलंदाजांचे सर्वांकडून कौतुक होतं असतांना काही लोकांकडून (खासकरून इंग्लिश क्रिकेटरांकडून) टीकाही झालेली. भारताने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हेतूपुरस्कार फिरकीला आणि भारताला अनुकूल असे खेळपट्टी बनवली असे टीकाकारांचे म्हणने होते.
ह्यात झालेली टीका आजची नसून मागील अनेक वर्षांपासून होत आलेली आहे आणि पुढेही अशीच होत राहील. वास्तविक जो यजमान संघ असतो तो त्याच्या बलस्थानावर खेळपट्टी बनवत असतो आणि हा नियम सर्वांनाच लागू पडतो. आशियायी देश spin bowlers ला मदत होईल असे खेळपट्टी बनवतात तर England किंवा Australia सारखे संघ वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टी बनवतात. अर्थात खेळपट्टी कसेही बनवो पण त्यामध्येही फलंदाज आणि गोलंदाज यांना समान chance असायला हवा. नाहीतर काही कसोटी सामने अडीच दिवसात संपतात. अश्या सुमार खेळपट्ट्या बनवणे हेही धोक्याचं आहे.
आजकाल एका अलिखित नियमानुसार असेच मानतात की जर कोणताही आशियायी संघ इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये जिंकला तरच तो चांगला संघ म्हणून गणला जाईल. बाकी आशियायी संघाना घरच्या मैदानांवर जिंकणे सोपे आहे. आता हा जो अलिखित नियम आहे तो बरोबर आहे का चूक आहे हा काही मुद्दा नाही. पण मला हे पटत नाही की हा अलिखित नियम फक्त आशियाई देशांनाच का लागू पडतो? आपण असं का नाही म्हणत जो पर्यंत इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारखे संघ भारतात येऊन जिंकत नाही तो पर्यंत ते चांगले संघ होतं नाही.
जर कोणत्या खेळाडूला आपलाही क्षमता सिद्ध करायची असेल तर लॉर्ड्स किंवा MCG ला चांगली कामगिरी करावी लागेल पण यामध्ये वानखेडे किंवा फिरोजशाह कोटला च नाव येणार नाही. हा जो गोऱ्या संघानी सोयीनुसार लावलेला न्याय आहे तो चुकीचा आहे.
यालाच "Colonial hangover" आपण म्हणतो आणि हा hangover फक्त cricket मध्ये नसून दैनंदिन जीवनातही रोज अनुभवायला मिळतो.
अनेक ठिकाणी हा व्यक्ती foreign return आहे हे त्याच्या नावाच्या पहिले सांगितले जाते.
कोणत्याही कपडे विकणारे कंपनीला बघा. कंपनी मूलतः भारतीय असली तरी त्यांचे नाव पाश्यात्य साच्यातल असेल. कारण ग्राहकांना पाश्यात्य नाव असेल तर त्यावर विश्वास बसेल आणि आपोआप त्याकडे ओढला जाईल. Products मागे असलेल्या माहितीवर वर "made in USA" ला "made in India" पेक्षा जास्त महत्व आहे.
आजकाल पुण्यात अनेक ठिकाणी फ्लॅट वैगरेच्या जाहिरातीचे बॅनर प्रत्येक रस्त्यांवर दिसतात. त्यामध्ये अनेक ठिकाणी "foreigner" लोक जाहिराती मध्ये दिसतात हे तर नवलंच आहे. तसेच ऑस्कर भेटल्याशिवाय सिनेमा सर्वोक्रुष्ट ठरणार नाही हा समज अजूनही आपल्याकडे अजूनही दिसतो.
हे कुठे तरी कमी व्हायला हवे. फक्त भौगोलिक ठिकाणांचे निकष लावून सर्वोकृष्ट किंवा हलके असे लेबल लावणे चुकीचे. अर्थात भारत ज्यापद्धीतीने प्रगती करतो आहे त्यानुसार अजून काही दशकामध्ये ही परिस्थिती नक्कीच बदलेल. तेव्हा भारत स्वतःचे निकष स्वतः ठरवेल आणि "made in India" लेबल वर लोकांचा विश्वास अधिक बसेल.
Note: यामध्ये अजून एक गमतीदार पण मला न आवडणारा मुद्दा म्हणजे foreign films मध्ये जेव्हा हिरो 100 लोकांना मारतो तेव्हा आपण त्याला "fictional सिनेमा" सारखे cute नाव देतो पण जेव्हा हेच सलमान खान आपल्या सिनेमा मध्ये करतो तेव्हा तेच लोक सिनेमाला नाव ठेवतात
Comments