top of page
Writer's pictureVandan Pawar

The Room on the Roof

नुकतच मी The Room on the Roof पुस्तक वाचल, त्यावर इथे मी माझे असलेले विचार थोडक्यात मांडत आहे.


पुस्तकाचे नाव :- The Room on the Roof

लेखक:- Ruskin Bond


 

माझा तुम्हाला सर्वांना एक सोपं प्रश्न आहे....!!


कधी तुमच्याबरोबर असं काही झाले आहे का तुम्हाला अचानक तुमचं राहत ठिकाण सोडून एका नवीन ठिकाणी रहायला जाव लागलं. जर तुमच्याबरोबर अस काही झालं असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की ते किती अवघड असत. अनोळखी ठिकाणी कस रहायचं, त्या ठिकाणी विस्वासू माणसं भेटतील का? किंवा तिथे adjust कसं होयच? असे अनेक प्रश्न डोक्यात घुमत असतात. अलीकडेच Covid मुळे हजारो लोकांनी जे काही कमावलं आहे, ते सर्वकाही सोडून एकीकडून दुसरीकडे स्थलांतरीत व्हावं लागलं. तो त्रास तर कल्पनेपलीकडे आहे.


The Room on the Roof हे पुस्तकात अश्याच एका तरुण नायकाची गोष्ट आहे ज्यामध्ये तो अचानक त्याचं मसुरीच घर सोडून बाहेर पडतो आणि त्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलत, आयुष्याबद्दलचा त्याचा दृष्टीकोन कसा बदलतो हे सांगितलं आहे. The Room on the Roof हे पुस्तक लिहिलं आहे "Ruskin Bond" यांनी आणि पहिली आवृत्ती प्रकाशित झाली १९५६ मध्ये.


The Room on the Roof ह्या पुस्तकाचा मुख्य नायक आहे Rusty.

Rusty हा अँग्लो-इंडियन वंशाचा असून तो डेहराडून मधील युरोपिअन वसाहतीत रहात असतो. Rusty अनाथ असल्याने तो Mr. Harrison आणि त्यांची बायको यांच्या बरोबर राहतो. Mr. Harrison यांचा पक्का निर्धार असतो की Rusty ला लहानपणापासून युरोपिअन म्हणूनच मोठं करायचं त्यामुळे त्यांनी त्याला जाणीवपूर्वक डेहरामधील भारतीय आणि त्यांच्या वस्तीपासून लांब ठेवलं. म्हणूनच Rusty ला युरोपिअन वसाहत सोडून बाहेर जाण्यासही सक्त मनाई होती. Mr. Harrison यांच्या कडक स्वभावामुळे आपोआपच Rusty एकलकोंडा बनला.


एके दिवशी Mr. Harrison बाहेरगावी गेले असतांना Rusty सर्व नियम तोडून युरोपिअन वसाहतीच्या बाहेर पडतो. जेव्हा तो डेहराडूनच्या मुख्य बाजारात येतो तेव्हा त्याला ते सर्व नवीन असत. बाजारातील गर्दी, रस्त्यावर फिरणाऱ्या गाई, खाण्याचे दुकान हे सर्व बघत असतांना त्याला सोमी आणि रणबीर हे दोन मित्रही मिळतात. एकलकोंड्या जगात वाढलेल्या Rusty साठी हे सर्व खूप भावत. Rusty ला आता बाजारात लपून येण्याची सवय लागते. हा सर्व लपून चाललेला खेळ Mr. Harrison यांना समजतो तेव्हा Rusty ला शिक्षा म्हणून मारत असतांना Rusty त्यांचा विरोध करून त्यांचं घर आणि युरोपिअन वसाहत कायमची सोडतो.


सर्व बंधन झुगारून बाहेर पडलेला Rusty ती रात्र बाजारातील फूटपाथवरच काढतो. एकीकडे त्याला मोकळ, स्वतंत्रत वाटत असलं तरी आता पोट भरण्यासाठी काय करायच हे सर्व विचार करत तो झोपी गेला. सकाळी त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र सोमी भेटतो. Rusty ची गोष्ट ऐकून सोमी त्याला घरी घेऊन जातो. इथे Rusty ची राहण्याची आणि पोटाची सोय होते. Rusty युरोपिअन वसाहत सोडून आल्या पासून भरपूर खुश असतो. सोमीच्या घरी काही दिवस राहिल्या नंतर तोही कामधंदा शोधण्याच्या मागे लागतो कारण त्याला सोमीवर अवलंबून राहायचं नसत.


सोमीकडे एक नोकरी चालून येते ज्यासाठी Rusty परिपूर्ण असतो. नोकरी असते English Teacher ची ज्यामध्ये सोमी यांच्या घराजवळ रहात असलेले Mr. Kapoor यांचा मुलगा किशन याला English शिकवण्यासाठी शिक्षक हवा असतो. हे समजल्यावर Rusty आणि सोमी दोघे Mr. Kapoor यांना Interview साठी भेटायला जातात. तिथे Rusty ला मीना म्हणजे Mr. Kapoor यांची बायको आणि मुलगा किशन भेटतात. Rusty च्या लक्षात येत मीना यांचं वय कपूर यांच्यापेक्षा बरच कमी आहे आणि पहिल्या नजरेत तो मीनाच्या प्रेमात पडतो. Mr. Kapoor आणि मीना हे Rusty ला English Teacher म्हणून नोकरीवर ठेवतात आणि ते Rusty ला रहाण्यासाठी त्याच्याच घरात गच्चीवरील एक खोलीही(The Room on the Roof) देतात.


या नोकरीतुन Rusty ला पैसे आणि राहण्यासाठी हक्काचं घर असं दोन्ही गोष्टी मिळतात. Rusty ला भेटलेली खोली थोडी वेगळी असते. खोलीचं छप्पर काही ठिकाणी पडलं असल्याने त्यातून एक झाडाची फांदी खोलीत डोकावत असते. सकाळचा सूर्यप्रकाश थेट खोलीमध्ये शिरतो. त्यामुळे ही खोली Rusty साठी खास बनते. किशनला एकीकडे English शिकवत असतांना तो दुसरीकडे मीनाच्या प्रेमात पडतो. मीना बरोबर पुढील आयुष्य आनंदाने राहू, असले सर्व स्वप्न तो बघू लागतो. किशन तसा वात्रट असूनही Rusty वर त्याचा ठाम विश्वास बनतो. Rusty ही किशनला लहान भावा प्रमाणे जपतो.


Rusty पुढे जाऊन कवी किंवा लेखक होण्याचे स्वप्नही बघतो त्यासाठी त्याला किशनचा पाठिंबा असतो. किशनला आत्मविश्वास असतो Rusty उत्तम कवी बनेल पण Rusty ला अजून नसतो.


युरोपिअन वसाहत सोडल्यापासून Rusty च आयुष्य उत्तमरीत्या चाललं होत. त्याला कधी मागे वळून बघण्याची गरज भासली नाही किंवा Mr. Harrison यांना एकदाही भेटावसं वाटलं नाही. सर्व काही ठीक जात होत पण एका प्रसंगामुळे सर्व पालटून जात.


Mr. Kapoor आणि मीना दिल्लीला जात असतांना त्यांचा अपघात होतो आणि त्यामध्ये मीनाच निधन होत. हे सर्व Rusty साठी अनपेक्षित असतं. किशनला यानंतर त्याच्या नातेवाईकांकडे पाठवले जाते आणि Mr. Kapoor ही हरिद्वारला रहायला जातात. Rusty हा मीनाच्या जाण्याने खूप निराश आणि दुखी होतो. सोमीही पुढील शिक्षणांसाठी बाहेरगावी गेल्याने त्याला डेहराडूनमध्ये जवळच कोणीच राहिल न्हवत. काही झालं तरी Rusty ला परत Mr. Harrison कडे रहायला जायचं न्हवत म्हणून त्याने परत लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. लंडनला जाण्याआधी एकदा किशन आणि Mr. Kapoor यांना भेटावं म्हणून तो हरिद्वार जातो, जिथे Kapoor रहात असतात. हरिद्वारला पोहचून Rusty ला समजत Kapoor यांनी मीनाच्या मृत्यूनंतर लगेच दुसरं लग्न केलं असून ते त्यांच्या आयुष्यात खुश आहे आणि किशन kapoor यांचं घर सोडून पळालेला असून तो चोर बनलेला आहे. यानंतर Rusty हरिद्वारच्या घाटांवर किशनला शोधतो. किशन सापडल्यावर लंडन रद्द करून त्याला घेऊन डेहराडूनला परत जाण्याचा निर्णय घेतो. डेहराडूनला पोहचून Rusty ने English teacher बनायचं आणि किशनने चाटच दुकान टाकायचं हे ठरवून नवीन आयुष्यची सुरवात करतात.


एका आयुष्यात इतकं काही पाहून झाल्यावर आता किशन आणि Rusty या दोघांना विश्वास असतो, Rusty पुढे जावून नक्की मोठा कवी बनेल.

The Room on the Roof बद्दल मला एक खास वाटते म्हणजे Ruskin Bond यांनी वयाच्या १८ व्या वर्षी हे पुस्तक लिहिलं. इतक्या कमी वयात मनाला भिडणारी गोष्ट लिहिणं नक्कीच सामान्य काम नाही. अजून एक गोष्ट म्हणजे Ruskin Bond आपल्या पुस्तकांद्वारेजी उत्तराखंडची खासकरून मसूरीची सफर घडवतात ती नक्कीच भारी आहे.


त्यामुळे मसूरीला गेल्यावर Ruskin Bond यांना भेटणं(जे की थोडं अवघड आहे) किंवा यांच्या मालकीचं Book Store ला भेट देणं माझ्या Bucket list मध्ये आहे.


तुम्हीही The Room on the Roof नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल....



27 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2_Post
bottom of page