आयुष्यात अनुभवाला replacement कधीच नसते. त्यामुळे बहुतेक वेळा वयोवृद्ध व्यक्तीकडे तरुण व्यक्तीपेक्षा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन जास्त व्यापक असतो. यामध्येही जर कोणी व्यक्ती मुत्यूच्या दारात बसला आहे तोच तुम्हाला जीवनाचे महत्व सर्वात जास्त सांगू शकतो.
मी कुठे तरी एकदा वाचले "२० वर्षाचा माणूस इतर आपल्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करतो, ४० वर्षाचा व्यक्ती इतर आपल्याबद्दल काय विचार करतात याकडे दुर्लक्ष करतो आणि ६० व्या वर्षी समजत इतर आपल्याबद्दल विचारच करतच न्हवते".
जगण्याच्या अनुभवातून येणाऱ्या शिक्षणामुळे कोणताही व्यक्ती (सर्वच नाही) समुद्रासारखा व्यापक आणि पृष्ठभागावर का होईना शांत दिसतो. त्यामुळे आयुष्यबद्दल कोणाकडून शिकायचे असेल तर त्याने किमान आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहायला हवे ही किमान अट तरी हवी.
पुस्तकाचे नाव:- Tuesday With Morrie
लेखक:- Mitch Albom
Nightline Interview of Morrie: - https://www.youtube.com/watch?v=RtYyT6Hl3ms
नुकतेच माझ्या वाचण्यात "Tuesday With Morrie" हे पुस्तक आले. हे पुस्तक प्रामुख्याने अवलंबून आहे "Morrie Schwartz" यांच्यावर. थोडक्यात सांगायचे म्हणजे ७८ वर्षाच्या Morrie यांना तोपर्यंत कुठलाही उपचार नसलेला ALM हा दुर्मिळ आजार झालेला असतो. कितीही काही झाले तरी त्यांच्याकडे 3-6 महिन्यापेक्षा जास्त काळ राहिला नसतो. इतके असूनही त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अथवा अजूनही जागृत असलेली विनोदबुद्धी यामुळे ते अमेरिकेत सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनतात. यातूनच 1994 साली Nightline नावाच्या TV चॅनेलवर त्यांची पहिली मुलाखत प्रसिद्ध होते.
Nightline वर प्रसिद्ध झालेली हि मुलाखत क्रीडा पत्रकार असलेला "Mitch Albom" हा एक दिवस बघतो. Morrie हे 1970 च्या दशकात जेव्हा brandies college मध्ये शिक्षक असतात तेव्हा Mitch हा त्यांचा विद्यार्थी असतो. Mitch याच्यासाठी Morrie आवडते शिक्षक असतात आणि Morrie यांनाही Mitch हा प्रिय असतो. कॉलेज संपते तसे त्यांचा संपर्कही संपतो नंतर अचानक अनेक वर्षानंतर Mitch याला Morrie यांच्या बद्दल Nightline च्या interview मधून समजते.
पुढे Mitch हा Morrie यांना भेटण्यासाठी जातो आणि Morrie कडून आयुष्याबद्दल काही बोलावे आणि त्यातून भविष्यात पुस्तक लिहावे म्हणून प्रत्येक Tuesday ला त्यांना भेटायला जातो आणि ते दोघे विविध विषयांवर बोलतात.
हा सर्व संवाद Mitch यांनी मांडला आहे Tuesday with Morrie पुस्तकातून. यातील काही मुद्दे मी इथे थोडक्यात मांडतो आहे.
1. संस्कृती: Morrie यांच्यानुसार प्रत्येक व्यक्तीवर संस्कृतीनुसार जगणे लादले जाते. जसे प्रत्येक गोष्टीचे चांगले वाईट पैलू असतात तसे संस्कृती किंवा परंपरा यांचेही असतात. यातील आपण चांगले घ्यावे आणि इतर सोडून द्यावे. जर तुम्हाला संस्कृतीचे काही भाग पटत नसेल तर त्यांना झुगारून टाकण्याची तुमच्यामध्ये धमक हवी.
2. हेवा: हेवा हा मनुष्याचा स्थायी भाव आहे. कोणी बोलून दाखवतात कोणी दाखवत नाही पण प्रत्येकाला कसला तरी हेवा असतोच. Morrie यांच्या नुसार "तुम्हाला जी गोष्ट मनापासून आवडेल ती गोष्ट करा. जेव्हा केव्हा तुम्ही आवडणाऱ्या गोष्टी करतात तेव्हा तुम्ही समाधानाने आणि आनंदाने जगतात. तेव्हा आपसूकच इतराबद्दलचे हेवेदावे कमी होतात. तुम्ही तुमचे सुख इतरांवर अवलंबून ठेवत नाही.
यातून मला मसाला सिनेमा मध्ये दिलीप प्रभावळकर यांचे एक छान वाक्य आठवले "मी आनंदासाठी काही करत नाही जे करतो ते आनंदाने करतो".
3. अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी: Morrie यांच्या नुसार अर्थपूर्ण किंवा संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करा, स्वतःला community च्या सेवेसाठी वाहून टाका. यामुळे तुमच्या आयुष्यला एक sense of purpose येईल ज्यामुळे तुमचे आयुष्य अर्थपूर्ण होवू शकते. यामध्ये community छोटी असली तरी ठीक आहे.
मध्यतंरी मी कुठे तरी वाचलं की एका सुप्रसिद्ध लेखकाने लोकांमध्ये वाचनाची आवड वाढावी म्हणून घराखाली open लायब्ररी सुरु केली. याद्वारे एक community ही बनली आणि लोकांमध्ये वाचनाची आवड वाढावी हा sense of purpose ही लेखकाच्या आयुष्यात आला.
4. मरण: आपल्याकडे तसे जिवंत असतांना मरणावर बोलणे थोडे akward असते. परंतु मरण न टाळता येणारे सत्य आहे ते तितकेच खरे.
Morrie यांच्या नुसार "पहिले मरणाबद्दल शिकून समजून घ्या त्यानंतर आपोआप तुम्ही जगायला शिकाल".
"You always fear what you don't understand"
5. माफ करणे किंवा दया: तुम्ही कोणत्याही प्रवचनात एक विचार नक्कीच ऐकला असेल तो म्हणजे "माणसाने माफ करायला शिकायला हवे". Morrie यांच्यानुसार माणसाने "स्वतःला माफ करणे तितकेच महत्वाचे जेवढे दुसऱ्यांना माफ करणे".
आता तुम्ही कुठेही असो तुम्ही भूतकाळात केलेल्या चुका तुमच्या मनात ठळक असतात. त्यामुळे कधी तरी स्वतः केलेल्या चुकांबद्दल स्वतःलाच माफ करणे ही स्वतःकडून स्वतःसाठी दिलेली अनमोल भेटच आहे.
6. प्रेम: आतापर्यंत प्रेमाच्या खूप व्याख्या ऐकून अथवा देऊन झाल्या. यातील एक व्याख्या प्रकर्षाने आठवते ती Kuch Kuch Hota Hai सिनेमामधली. जेव्हा Professor miss braganza राहुलला विचारते "Rahul, Pyar kya kai?" तेव्हा राहुल उत्तर देतो "Pyaar dosti hai".
यालाच जोडून Morrie यांच्या नुसार "प्रेम म्हणजे तुम्ही दुसऱ्याची तेवढीच काळजी किंवा चिंता करतात जेवढी स्वतःची करतात".
उदाहरण म्हणजे तुम्ही दुसऱ्याची गाडी आणि आपली गाडी चालवण्यातला फरक यामध्ये कुठे तरी प्रेम असत.
याशिवाय अनेक गोष्टी Morrie यांनी स्वतः बद्दल, लहानपणी पाहिलेलं कठीण प्रसंग आणि त्यातून घडलेले त्यांचे व्यक्तीमत्व याबद्दल सांगितले आहे. Tuesaday with moorie हे जरी बाहेरून self help किंवा motivation type वैगरे सारखं वाटत असलं तरी ते त्यापेक्षा खूप वेगळे आहे.
"ज्या व्यक्तीला माहिती आहे तो येत्या काही महिन्यात मरणार आहे तरी त्याची विनोद बुद्धी अजूनही जागृत आहे, जो त्याच्या मरणावरच हसतो आणि जो भूतकाळात झालेल्या चुका खुल्या मनाने मान्य करतो तो व्यक्ती नक्कीच आयुष्य कसे जगावे" हे सांगू शकतो असे मला वाटते.
तुम्हीही "Tuesday with Morrie" पुस्तक नक्कीच वाचा, तुम्हाला नक्की आवडेल....
Comments