नमस्कार मंडळी,
दिवाळीच्या सुट्टी नुकतीच संपली आणि विश्रांती नंतर परत एकदा आयुश्याची गाडी पुन्हा सुरु झाली. ह्याचबरोबर आपला गडकिल्ले पाहण्याचा आणि अनुभवण्याचा ध्यासही परत सुरु झाला. गडकिल्ले भ्रमंतीमध्ये यंदा जायचं ठरलं "पुरंदर" किल्लेवर. पुरंदर नाव घेतल्यावर इतिहासातल्या अनेक प्रसंग समोर येतात. पहिले म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म ठिकाण म्हणजे "पुरंदर". दुसरं म्हणजे शाळेत सर्वांनी वाचला असेल तो "पुरंदरचा तह". तिसरे म्हणजे इंग्रजांनी पुरंदरच भौगोलिक मह्त्व समजुन येथे "Army Training Center" उभारलं आणि आजगायत हे Center तसंच सुरु आहे फक्त आता भारतीय सेना हे चालवते.
एक गोष्ट सर्वानी सुरवातीला जाणुन घ्यावी ती म्हणजे येथे "Army Training Center" असल्याने येथे बरीच tight securitya आहे आणि काही भाग हा प्रतिबंधित असून तिथे जाण्यास सक्त मनाई आहे. पुरंदरचा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ आहे़. राजगड आणि तोरणा हे दोघं किल्लेही याच भागात आहे. पुरंदर पुणे पासुन साधारणतः ५०-६० किमी अंतरावर पडतो. प्रतिबालाजी आणि जेजुरी हे देवस्थान पुरंदर किल्ल्याच्या आजूबाजूला आहे.
ठरल्या प्रमाणे शनिवारी सकाळी मी पुरंदरसाठी निघालो. पुरंदरला भेट देण्याची वेळ ९ ते ४ असल्याने फार लवकर जाऊनही तिथे फायदा नाही. जायचा रस्ता चांगला असलेण्या आणि Highway असल्याने १:३० तासात मी पुरंदरच्या मुख्य चेक पोस्ट वर पोहचलो. इथे आर्मी check post वर आपली आणि आपल्या सामानाची चौकशी करूनच आत मध्ये सोडलं गेलं. महत्वाचं म्हणजे किल्ल्यावर कॅमेराचे साहित्य घेऊन जाऊ देत नाही तर इथे कॅमेरा आणायचा टाळा. मोबाइलला परवानगी आहे तर मोबाईल मधुन फ़ोटो पर्यटक काढू शकता. सध्या कोरोना काळ असलेण्या लस घेतल्याचं प्रमाणपत्रही दाखवणं गरजेचं आहे. हे दाखवताना माझी बरीच धावपळ झाली पण शेवटी परवानगी भेटली आणि किल्ल्याकडे प्रस्थान केलं.
आतमध्ये गेले वर पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरंदर आणि इतर किल्लेमधील फरक. किल्ल्यावर ठिकठिकाणी असलेले दिशादर्शक फलक, स्वच्छतागृह, कचरापेटी, परिसराची स्वच्छता, गाडी लावण्यासाठी सुटसुटीत जागा आणि बरंच काही. त्यामुळे पहिल्या नजरेत पुरंदर सुखावुन जातो. पुढे जाऊन
यांचे समाधी मंदिर आणि अगदी रेखीव पुतळा दिसला. एक बंद पडलेलं चर्चही लागलं सुरवातीला इथे चर्च पाहुन थोडं कुतूहल वाटलं पण नंतर लक्षात आला बहुतेक इंग्रजांनी त्याचे काळात हे बांधलं असावं. थोडं पुढे महादेवाचं छोटं पण खूप सुंदर मंदिर लागलं त्याला लागून एक घर/उपहारगृह आहे जिथे जेवायची किंवा सामान घेण्याची सोय आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरचा असल्याने इथे भारतीय सेनेने "छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ" फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरु केलं. हे स्मृतिस्थळ पाहून फक्त मीच नाही तर माझ्या बरोबर असलेले प्रत्येक पर्यटक भारावून गेले. इथे थोडक्यात संभाजी महाराजांचा इतिहास आणि मराठा साम्राज्यतले महत्वाचे किल्ले यांचे फोटो आणि माहिती आहे. अप्रतिम माहिती आणि त्याएवढीच सुंदर पैंटिंग त्यामुळे सर्वानी पुरंदरच "छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ" एकदा तरी नक्की बघा.
हे सर्व पाहुन झाल्या वर गडावरती चढायला घेतलं. तसा चढाई कमी असल्याने आणि रस्ता सोपा असल्याने अर्ध्या तासात वरती पोहचलो. गडावरती चढून तटबंदी वरून विहंगम दृश्य बघायला मिळाले. किल्ल्या वरती बघण्यासारखा फक्त केदारेश्वराचं मंदिर आहे बाकी काही भाग प्रतिबंधित आहे. त्यामुळे गडावरती थोडा आराम करून आणि फोटो काढून परतीच्या प्रवासाला लागलो. पुरंदर किल्ल्याची चढाई सोपी असल्याने येथे सहकुटुंब येणं सहज शक्य आहे आणि एकूण गडावरची वर्दळ पाहून त्यामध्ये लहान मुलापासून आणि वयोवृद्धही होते.
अश्या पद्धतीने मराठा साम्राज्यचे धाकले मालक छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेले आणि भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या स्थानी असलेल्या पुरंदर किल्ला बघितला आणि अनुभवाला.
Comments