top of page

किल्ला श्रीवर्धन (राजमाची) - भाग दुसरा

Writer: Vandan PawarVandan Pawar

राजमाचीला जाणाऱ्या रस्त्याचा अंदाज न आल्याने १२ वाजून गेले होते आणि वेळेचं गणित थोडं गडबडलं होतं. म्हणूनच आता कुठे जास्त न थांबता किल्लावर पोहचायचं ठरवलं.


अगदी सुरवातीपासून पायऱ्या आहे त्यामुळे कष्ट कमी होतात आणि वेग वाढतो. ३०० मीटर वरती गेल्यावर डावीकडे एक मंदिर येत, येथून दोन फाटे फुटतात. एक रस्ता "मनोरंजन" आणि दुसरा "श्रीवर्धन" किल्ल्यावर जातो. मंदिराच्या आवारात साधारणतः ७० वय असलेले आजोबा काकडी, पेरू विकत होते. त्यांनीच आम्हाला राजमाची गाव, गडाबद्दल थोडीफार माहिती दिली आणि आम्ही पुढे निघालो. पुढे जाऊन पायऱ्या संपल्या आणि पायवाट सुरु झाली. बाकी किल्ल्याच्या मानाने इथे चढण सोपीचं असल्याने १५-२० मिनिटात गडाच्या प्रवेश द्वारावर पोहचलो.


प्रचंड, मजबूत आणि इतिहासाच्या अनेक प्रसंगांना सामोरा गेलेल्या दरवाज्याच्या खाली आरामात बसलो. अगदी समोर म्हणजे हाक जाईल इतक्या अंतरावर "मनोरंजन" किल्ला दिसत होता. प्रवेशद्वारावर थोडा आराम करून आता गडामध्ये जाण्याची वेळ झाली. आतमध्ये पोहचल्यावर पहिली गोष्ट जाणवली म्हणजे वाढलेलं गवत आणि झाडं. पाऊस नुकताच होऊन गेल्याने चारीबाजूला हिरवळ दिसत होती. गवत आणि झाडे दाट दिसत असल्याने फक्त पायवाट पुरतीच रस्ता शिल्लक होता. पुढे जाऊन एक छोटा पाण्याचा तलाव दिसला, क्षारमुळे तलाव हिरवागार दिसत होता, तिथे न थांबता थेट गडावरती चालत राहिलो. अजून पुढे गेल्यावर दोन फाटे फुटले. एक फाटा गडाच्या सर्वोच ठिकाणी तर दुसरा थोडा दूर जाऊन तटबंदीला पोहचत होता. मी तटबंदीला पहिले जायचं ठरवलं. लांबूनच तिथे फडकवलेला भगवा झेंडा आणि त्यावर असलेलं छत्रपती शिवाजी महाराजचं चित्र लख्ख दिसत होत. तटबंदीवरुन १६-१७ किमीचा कच्चा रस्ता दिसत होता आणि इतक्या कठीण प्रवासाचं चीज झालं हे तिथून जाणवत होत. राजमाची किल्ला जर google वर कुठेही टाकला तर अगदी एक फोटो हमखास दिसतो तो हाच point आहे. जर तुम्ही कोणीही राजमाचीला आले तर इथे नक्की या. इथे थोडे फोटो काढून परतीच्या रस्त्याने निघालो कारण वेळ बराच झाल्याने आणि जायचा रस्ता भयंकर असल्याने अंधार होण्याआधी लोणावळा गाठलेल बर.



परतीच्या प्रवासात दोघं किल्ले मनामध्ये साठवत खाली उतरलो. जिथे गाडी लावली होती तिथे गावांतील लोकांकडून एक विलक्षण माहिती भेटलीकी अजूनही राजमाची गावात वीज आलेली नाही. अगदी १०-१५ किमी पहिल्या करोडो मध्ये असलेले घर आणि इथे अगदी मुलभूत गोष्टीसाठीही माणूस झगडतो हे आपल्या इथेच होऊ शकतो.


हे सर्व बघून वाटलं, बहुतेक गोष्टीची आपल्याला कदर नसते कारण माणसाला हे जाणवत नाही ज्या गोष्टी त्याच्यांसाठी necessity आहे त्या अजूनही कोणासाठी luxary आहे.


म्हणूनच मनातच मला जे काही भेटलं आहे त्यासाठी धन्यवाद म्हणून परत पुणेला निघालो!!

1 Comment


kajal Sonawane
kajal Sonawane
Dec 21, 2021

Very Nice Vandan. Keep it up🤗

Like
Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • LinkedIn
  • Facebook

©2021 by Vandan Pawar. Proudly created with Wix.com

bottom of page