top of page
Writer's pictureVandan Pawar

तिकोना ऊर्फ वितंडगड

मान्सुन सुरु होऊन काही दिवस झाले, मान्सुन बरोबर अनेक जुन्या आठवणी घेऊन येतात. जसे मान्सुन आणि शाळा जवळपास बरोबरच सुरु होतात, घरच्याना नवीन रेनकोट किंवा छत्री मागायची आठवन, गड किल्ले फिरायच्या आठवणी. आयुष्याच्या ह्या वळणावर अनेक गोष्टी मागे राहिल्या. पण माझ्या सारख्या अनेक रिकामटेकड्या लोकांनी गड किल्ले फिरायची सवय जपली आहे. त्यामुळे मान्सुन बरोबर आमच्या डोक्यामध्ये फिरायचे वारे वाहू लागतात.

नुकताच पुण्याला लॉकडाउन पासुन थोडा आराम मिळाला. पाऊसाच प्रमाणही ह्या वर्षी मुबलक आहे. पुण्यामधे पहिला पाऊस झाल्या वर पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे सिंहगडाची वारी. म्हणूनच तर काय दरवर्षी प्रमाणे यंदाही सिंहगडावर गर्दी झाली आणि नाईलाजाने स्थानिक शासनला वीकेंडला सिंहगड बंद करावा लागला. पण म्हणतात ना अडचणी आल्या म्हणून माणसाने आपले स्वप्नं बदलू नये उलट ते पूर्ण करण्याचा मार्ग बदलावा लागला तर हरकत नाही. त्यामुळे हंगामाची सुरवात तिकोना उर्फ वितंडगड पासून करण्याचं ठरवलं.

माझ प्रवास वर्णन सुरु करण्यापूर्वी तिकोना बद्दल जाणून घेऊया

तिकोना ऊर्फ वितंडगड पुणे लोणावळा मध्ये वसलेल्या पवनमाळ प्रांतात आहे. पुणे मुंबई द्रुतगति महामार्गावरून हा किल्ला दिसून येतो. त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून याचं नाव तिकोना. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. शिवरायांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेखा ठेवण्यासाठी होत असे. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने तो जैतापूरला निघून गेला. आजवर अनेक लढाई अनुभवलेल्या या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे.



तिकोना गडाची सुरवात


पुणे पासून साधारणतः ६० किमी असलेला तिकोनावर आपण एक किंवा दीड तासात पोहचू शकतो . ठरले प्रमाणे मी सकाळी ८ वाजता घरातून निघालो. एकदा का तुम्ही पवना धरणा जवळपास पोहचता तेव्हा छान दृश्य पाहायला मिळतात, त्यामुळे १-२ फोटोसाठी थांबणं कर्तव्यच आहे. गडाच्या पायथ्याला तिकोना पेठ गाव आहे तिथे तुम्हाला गाडी लावायची आणि नाश्त्याची सोय भेटेल. तिथून तुम्हाला डोंगरधार दिसून येते तिथूनच गडाची चढाई सुरु होते. तिकोना चढायला सोपा आहे पण इतका पण सोपा नाही की तुम्ही निष्काळजी पणे चढाव. पाच मिनिटांच्या चढाईनंतर आपल्याला किल्ल्याचा दरवाजा किंवा मेट लागते. मेटं म्हणजे गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा किंवा गडावर झालेला हल्ला परतवून लावण्याचं पहिलं ठिकाणं. गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. त्यानंतर चपेटदान मारुती, चुन्याचा घाणा अनेक गोष्टी पहायला मिळतात.

चपेटदान मारुती


चुन्याचा घाणा

इथूनच बालेकिल्ल्याची खडी चढाई सुरू होते. पायऱ्यांची उंची जास्त असल्यानं चांगलीच धावपळ होते. अशा साधारण ५० पायऱ्या चढून आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. या चढाईदरम्यान गडाचा मुख्य दरवाजा लागतो. बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर जरंडेश्वराचं छोटे पण सुंदर मंदिर आहे. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून लोहगड, विसापूर, तुंग आणि पवना धरणा बघायला मिळतात. तिथे शिवदुर्ग संस्थेचे स्वयंसेवक भेटतात ते गडाचे पावित्र्य राखण्याचं काम करतात. त्यामुळे जर तुम्हाला असे स्वयंसेवक कोणतेही गडावर भेटले तर जशी जमेल तशी आर्थिक मदत करा.


जरंडेश्वराचं मंदिर

जर तुम्हाला थोडक्यात गिर्यारोहणाची मज्जा अनुभवायची असेल तर तिकोना चांगलं पर्याय आहे. साधारणतः ४-५ तासात तुम्ही चढून खाली येऊ शकता. चढायला सोपा असलेने अनेक कुटुंब तुम्हाला इथे पहायला मिळतील अगदी लहान मित्रही खूप असतात. त्यामुळे तुम्हीपण नक्कीच तिकोनाला भेट द्या आणि गडाचं पावित्र्य राखा.


मक्याच कणीस विकणाऱ्या स्थानिक



51 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2_Post
bottom of page