top of page
Writer's pictureVandan Pawar

पुस्तक- माझे मित्र..

"केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे" हे समर्थ रामदासांचे वचन माझ्या पुस्तक वाचनाच्या प्रवासात अगदी तंतोतंत लागू पडते. लहानपणापासून मला अवांतर वाचनाचे थोडेफार आकर्षण होते पण एक दोन प्रसंग सोडले तरी कधी मी पुस्तकंही हातात घेतलं नाही. पण म्हणतात ना कोणतीही सवय आपोआप लागत नाही, आपण ती स्वःताहुन लावून घेतो. त्याचप्रमाणे मीही आता कासवाच्या गतीने प्रवास करून पुस्तकांच्या प्रेमात पडलो आहे.


कॉलेज पर्यंतच्या आयुष्यात मला अजूनही दोन प्रसंग आठवतात जेव्हा मी अवांतर वाचन केलेलं. पहिल्या प्रसंगात मी सातवीत असतांना शाळेत एक उपक्रम होता ज्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांला दोन पुस्तके भेटतील आणि एका महिन्यात वाचून परत करायची. मला अजूनही आठवत की मला "Bermuda Trainagle" आणि महात्मा गांधी यांचे वर आधारीत अशी दोन पुस्तक भेटली. त्यातलं "Bermuda Trainagle" पुस्तक मला खूपच आवडलेल कारण त्यामधून ज्याकाही मी ऐकलेल्या दंतकथा होत्या त्या सर्व clear झाल्या.


दुसरा प्रसंग म्हणजे Engineering ला असतांना अचानक घरी असलेली "ययाति" कादंबरी दिसली. सहजच वाचावं म्हणून जेव्हा ययाति हाथात घेतलं आणि जेव्हा संपूर्ण वाचून झालं तेव्हा मी उडालोच. लेखानाची ताकद काय असते हे मला ययाति मधून समजल. Non linnear storytelling काय असते हे ययाति मधून थोड उमंगल. ययाति मध्ये असे अनेक प्रसंग होते, तेव्हा मला ते समजले न्हवते किंवा त्यांचा अर्थ तेव्हा समजला न्हवता पण आता 10 वर्षानंतर मला ययाति पहिल्या पेक्षा अजून जास्त समजली आहे असं वाटत. चांगल्या लेखानाची ताकद हीच असतें की जेव्हाही आपण ते वाचतो तेव्हा प्रत्येकवेळी एक नवीन विचार भेटतो.


ययाति बरोबर "वी. स. खांडेकरांची" ओळख झाली. शाळेत त्यांच नावं कानावर पडतच असत पण जेव्हा प्रत्यक्ष त्यांची ययाति वाचून जी ओळख झाली ती कधीही पुसता येणार नाही. आजकाल मी जे थोडफार वाचतो आहे त्याचा पाया ययातिनेच बांधला हे एक सत्य आहे आणि लेखानातील ताकद किती प्रचंड असते हे ययातिने शिकवलं.

ययाति नंतर वाचनाची सवय कमी झाली. कॉलेजला असतांना चेतन भगत यांची पुस्तकं वाचली पण इतर वाचन पूर्ण बंदच पडलं. कदाचित मला आता कोणी विचारलं भूतकाळात जाऊन तूला कोणती एक गोष्ट बदलता येईल तर मी कॉलेजमध्ये बंद केलेलं वाचन ही चूक नक्कीच दुरुस्त करेल.


त्यानंतर तब्बल 5-6 वर्षाच्या मध्यतरानंतर रणजित देसाई लिखित "श्रीमानयोगी" हे शिवाजी महाराजांवरील कादंबरी वाचली आणि परत एकदा मी वाचायला लागलो. रणजित देसाई यांनी अश्या पद्धतीने शिवाजी महाराजांचे आयुष्य उलगडले आहे की ते पुस्तक सुटता सुटत नाही. माझ्या आयुष्यात "ययाति" नंतर ज्याला आपण break through म्हणतो ते म्हणजे "श्रीमानयोगी".


त्यानंतर मी स्वतःहून पुस्तक वाचनात पुढाकार घेऊ लागलो. पहिल्यांदा अगदी सोपी, लघुकथा असलेले पुस्तक निवडून वाचू लागलो ज्यामध्ये R K Narayan यांनी लिहिलेलं "Malgudi days" वाचल. माझ्या

पुस्तक वाचनात "Pune Marathi Toastmaster club" चा भरपूर मोठा वाटा आहे. मंडळाच्या दोन सभेतून मला "व्यक्ती आणि वल्ली" आणि "बर्लिनची भिंत" या दोघं पुस्तकांबद्दल माहिती मिळाली. जेव्हा मी "व्यक्ती आणि वल्ली" वाचलं तेव्हा खऱ्या अर्थाने मी पूल यांना भेटलो. पूल हे महाराष्ट्रचे लाडके व्यक्तीमत्व का आहे याची प्रचिती मला तेव्हा आली. अजूनही नारायण, नंदा कामत, अंतू बर्वे यासारखे कथा जितक्या वेळा वाचू तितक्या कमी आहे.


पूलच लिखाण वाचतांना वपु पण भेटले. एकेक शब्दाच महत्व मला वपु कडून समजल. त्यानंतर अच्युत गोडबोले याचं व्यक्तिमत्व "मुसाफिर" मधून दिसल. गोडबोले यांचे जीवन sci-fi movie पेक्षा कमी नाही. एक माणूस दोन वेगळे आयुष्य एकाच जन्मात कस जगू शकतो हे मुसाफिरमधून दिसलं. सुधा मूर्ती यांच्या लिखाणातून आयुष्याच्या अनेक अनमोल ज्ञान अगदी गोष्टी स्वरूपात समजल्या.


इतपर्यंत तर मी पुस्तकांच्या संपूर्णपणे प्रेमात पडलो. शाळेत असतांना शिक्षक सांगायचे "पुस्तक हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहे" हा सुविचार मी आयुष्यात स्वीकारला. पुस्तकांच्या माध्यमातून मी एका नवीन जगात प्रवेश केला ज्या जगाची कथा दुसऱयांची असते पण मुख्य सूत्रधार मीच असतो. पुस्तकांतून कधी मीना प्रभू यांच्या डोळयांनी चीन, इस्राईल, पॅलेस्टाईन, जॉर्डन बघतो तर कधी अनिकेत केतकरच्या पाठीवर माझ बॅकपॅक देऊन मी व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया बघून येतो. यासारखे अनेक विलक्षण अनुभव वाचनातून मला मिळाले. जेवढं मी वाचत जातो तेवढीच जाणीव होते की अजूनही भरपूर वाचायचं बाकी आहे.


हा Blog माझ्या वाचनाच एक अपत्य आहे. पुस्तकं वाचनातून जो डोक्यात data download होतो आणि विचारांच जे काहूर माजत ते विचार कुठेतरी upload करावे म्हणून हा Blog एक साधन आहे. इथे मी वाचून झालेल्या आणि मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.


सध्या मी तुमचा निरोप घेतो.


धन्यवाद.

25 views0 comments

Recent Posts

See All

Comentários


Post: Blog2_Post
bottom of page