टोकियो ऑलिंपिक अवघ्या काही दिवसावर येवून थांबल आहे पण अजूनही त्यावर अनेक प्रश्नचिन्ह आहे. खरतर मागच्या वर्षी होणार ऑलिंपिक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल. तरी अजून स्पर्धा होईल की नाही या बद्दल शंकाच आहे. कोणत्याही खेळाडूसाठी आणि खेळ प्रेमीसाठी ऑलिंपिक न होण हे दुदैर्वीच आहे.
माझा मुद्दा असा आहे की आपल्याला ऑलिंपिक भारतात आयोजित केलेल कधी पहाता येइल? अजूनही ऑलिंपिक म्हंटल तर लिअँडर पेसने अटलांटा ऑलिंपिकमधे जिंकलेल कांस्यपदक आणि पदक वितरणाचे वेळी भावुक झालेला लिअँडर, राजवर्धन राठोडने शूटिंग मधे आणलेल रौप्यपदक, अभिनव बिंद्रा सुवर्णपदक जिंकल्यावरही त्याचा शांत चेहरा किवा दीपा कर्मकार चे वेळी अगदी कमी माहिती असलेला जिम्नॅस्टचा अंतीम सामना पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा टीवी कडे लागलेल्या साफ आठवते. त्याचमुळे माझ्या सारखे अनेक खेळप्रेमी ऑलिंपिक भारतामधे बघायला आसुसले असतील.
ऑलिंपिक आयोजीत करणं हे फक्त खेळाच्या स्पर्धा भरवन्ं नसुन तो एक मोठा इव्हेंट असतो. त्यामधून देश आपलं शक्तीप्रदर्शन करतो. ऑलिंपिकच आयोजन करण्यासाठी प्रचंड पैसा ओतावा लागतो, दूरदृष्टी ठेवून नियोजन आखाव लागत, अगदी नवीन शहरेही वसवावी लागतात. त्यामधे भरपुर शक्ती खर्ची लागते. त्याचमुळे जपान तिथल्या लोकांचा विरोध असुनही स्पर्धा घेण्यास अनुकूल आहे. चीनने बीजिंग आणि ब्राझीलने रिओ ऑलिंपिक यशस्वी करण्यासाठी किती मेहनत घेतली होती याचे अनेक पुरावे उपलब्ध आहे.
अजुनही आपल्या देशात बोटावर मोजावे इतके पदक विजेते आहे. त्याचमुळे भारतालाही जागतिक स्तरावर एक पायरी वर चढायच असेल तर ऑलिंपिक सारखे जागतिक स्पर्धा देशात आयोजीत करायला प्रोत्साहन देयला हवं. एकूण त्याने देशात खेळाडूंना आणि भावी आयुष्यात खेळाला व्यवसायीकरीत्या पाहणाऱयांसाठी संजीवनी ठरेल. तसही खेळामध्ये सर्वोत्तम बनल्याशिवाय विश्वगुरू बनण्याचं स्वप्न सत्यात येणार नाही.
सध्यातरी 20 वर्ष भारत ऑलिंपिकचे आयोजनासाठी तयार दिसत नाही. पण तो पर्यंत छोट्या स्वरुपाचे स्पर्धाच्या आयोजनासाठी प्रयत्नशील रहावे जसे की कामनवेल्थ, आशियायी खेळ स्पर्धा. २०१० ची कामनवेल्थ स्पर्धामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीचं नियोजन यामूळे देशाला आणि चाहत्यानां मोठा झटका बसलेला होता. त्यापासून धडा घेवून नवीन जोमाने तयारी करावी. BCCI ने IPL मधून क्रिकेटविश्वात एक क्रांती घडवली तेच आपण इतर खेळामध्ये कऱण्याचा प्रामाणिक प्रयन्त तरी करावा ही अपेक्षा.
यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, सरकारी यंत्रणांचा पाठींबा, पैसा आणि भ्रष्टाचार शुन्य यंत्रणा हवी. शेवटी देशाचा आणि समाजाचा सर्वांगिण विकासासाठी खेळ महत्वाचं आहे आणि खेळाला लोकप्रिय बनवण्यासाठी ऑलिंपिक सारख्या स्पर्धाच यजमानपद भूषवण जरुरी आहे.
Comments