top of page
Writer's pictureVandan Pawar

मसूरी, उत्तराखंड - (भाग दुसरा)

Updated: Jun 7, 2022

पहिला भाग :- https://www.vandanpawar.com/post/मसूरी-उत्तराखंड-भाग-पहिला डेहराडून वरून निघाल्यावर दुपारी 1 वाजता मी मसूरीमध्ये उतरलो आणि लायब्ररी रोड वरील माझ्या hostel पोहचलो. मागील भागात सांगितल्याप्रमाणे मसुरीमध्ये येण्याचा माझा एक उद्देश लेखक Ruskin Bond यांना भेटणेही होता. त्यामुळे इंटरनेट वाचलेल्या माहितीनुसार दर शनिवारी ते त्यांच्या मालकीच्या Cambridge bookstore वर येतात म्हणून मी सुद्धा दुपारी त्यांच्या दुकानावर जाणार होतो.

ठरल्याप्रमाणे मी सर्व आवरून मॉल रोडला निघालो. मी लायब्ररी रोड म्हणजे मॉल रोड पेक्षा खालील टेकडीवर राहायला असल्याने एक डोंगर वरती चढून जाण्यासारखाच रस्ता होता. एक गोष्ट वेगळी म्हणजे येथे कच्चा रस्ता नसून काँक्रीटचे रस्ते होते. रस्त्यांच्या दुतर्फा छोटी घरे होती आणि रस्त्याला शेजारी अलगद लावून चारचाकी होत्या. अश्या अडचणीच्या ठिकानावरून गाडी काढणे किंवा लावणे किती अवघड असत ते नवीन सांगायला नको. पहाडी भागामध्ये असे दृश्य सगळीकडेच दिसते. एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे एक डोंगर चढून किंवा उतरून दुसऱ्या ठिकाणी जाणे असाच होतो. असा १० मिनिटाचा चढ ओलांडून मी धापा टाकत मॉल रोड वर पोहचलो. तिथून जवळच मला Cambridge bookstore दिसलं आणि मी आतमध्ये गेलो. दुकानात गेल्यावर समजलं मागील २ वर्षापासून म्हणजे covid सुरु झाल्यापासून Ruskin Bond यांनी दुकानावर येणं बंद केल. त्याचं वय ९० च्या जवळपास असल्याने त्यांनी खबरदारी म्हणून हे पाऊल उचललं हे अजून माहिती घेतल्यावर समजल. त्यामुळे यंदातरी Mr. Bond यांना भेटण्याची इच्छा अपूर्णच राहिली पण आता दुकानात गेलो आहे तर काहीतरी आठवण म्हणून घेऊनही जावू म्हणून तेथे पुस्तक चाळत बसलो. थोडावेळ पहिल्यानंतर "Rhododendrons in the Mist: My Favourite Tales of the Himalaya" ह्या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ न समजल्याने हेच पुस्तक घेऊन दुकानातून बाहेर पडलो. पुढे आयुष्यात कधीही ते पुस्तक बघेल तेव्हा मी थेट मसूरी मॉल रोड वरील Cambridge bookstore वर पोहचेल जिथे शेजारी मोतीमहल हॉटेल असून समोर momo's चा स्टॉल आहे.

दुकानात पोहोचण्याच्या धावपळीत संध्याकाळ झालीच होती. Weekend असल्याने मॉल रोडवर गर्दी वाढतच होती. मी थोडावेळ तिथेच थांबून मॉल रोड फिरू लागलो. कोणत्याही Hill-Station वर विशेषतः जे ब्रिटिश काळात स्थापित झाले आहे तिथे मॉल रोड हे "centre of attraction" असतात. मॉल रोडपासून पुढे जाऊन मला Rope-way दिसला कदाचित तो Picture palace (मसूरी मधील एक ठिकाण) पर्यंत पर्यटकांना पोहचवत असेल. अजून पुढे गेल्यावर एक छोटा स्तंभ आणि काही पुतळे दिसले ते पाहून मी तिकडे वळालो. तिथे लावलेल्या स्तंभानुसार ज्यांनी उत्तराखंड मुक्ती संग्रामामध्ये भरीव योगदान दिले त्यांचे ते पुतळे होते. तोपर्यंत मला पुसटशी कल्पनाही न्हवती उत्तराखंड मुक्तीलढा अशी काही गोष्ट होती. प्रत्येक पर्यटन स्थळांचाही त्यांचा काही इतिहास असतो पण त्यांच्या सौंदर्यामागे तो झाकोळला जातो. तो दिवस माझा लवकर संपला, मी परत डोंगर उतरून लायब्ररी रोड वरील हॉस्टेलवर पोहचून पुढच्या दिवसाची planning करून झोपी गेलो.


पुढच्या दिवशी सकाळी लवकर उठून balcony मध्ये येऊन बसलो तिथून बरंच मसूरी दिसत होतं. त्यादिवशी मी Kempty waterfalls, Landour आणि Lal tibba ह्या तीन ठिकाणी जाणार होतो. Kempty Waterfall मसूरी पासून २०-२५ किमी असल्याने मी एक rented bike घेऊन Kempty कडे निघालो. Kempty हे मसूरीपासून थोड बाहेर आहे. Kempty ला जाणार रोड पहाडातून जाणारा होता त्यामुळे दुचाकी वरून जातांना प्रत्येक डोंगराचा, नागमोडी वळणाचा, छोट्या मोठया पुलांचा अनुभवत घेत प्रवास करत होतो. एक तासाच्या नागमोडी प्रवासानंतर मी Kempty जवळ पोहचलो. रविवार असल्याने गर्दी भरपूर होतीच. Kempty waterfall इथे एक धबधबा आहे. धबधब्याजवळ जाण्यासाठी १-२ किमी खाली चालत जावं लागत. थेट धबधब्या जवळ जाण्यासाठी Rope-Way ची पण सोय आहे. धबधब्याजवळ पोहचून अस वाटलं की पूर्ण उत्तर भारत इथे पोहचलं आहे इतकी गर्दी होती. त्याच गर्दीचा एक भाग मी होतोच तसा. धबधबा छोटाच होता पण पाणी जोरात खाली कोसळत होते. इतक्या गर्दीतून मी जास्त वेळ न थांबता लगेच निघालो. वरती येतांना मला लक्षात राहिला एक ladies special group जो केसरी कडून आला होता, ते पाहून मला झिम्मा सिनेमा आठवला. असो मी तिथून निघालो आणि मसुरीला जातांना कुठेतरीमध्ये शांत ठिकाणी जेवून पुढे Landour गाठायचं होत.

Kempty falls वरून मसूरीला पोहचायला दुपार झाली होती. पुढील बघण्याची जागा होती Landour आणि Lal Tibba.

Landour हे मसूरी जवळच असलेल एक छोट cantonment town असून तेही ब्रिटिश काळात वसवलेले आहे. मसूरी आणि Landour यांना "Queen of the Hills" म्हणूनही ओळखले जाते. Ruskin Bond यांच्या अनेक पुस्तकांतुन Landour चा उल्लेख मी वाचला आहे. Landour हे नाव Llanddowror या एका United Kingdom मधील गावावरून पडले आहे आणि लांडोर हे नाव का पडले हे तिथे जाऊनच मला समजले. ब्रिटिश लोकांसाठी Landour हे त्यांच्या मातृभूमीची आठवण करून देणारे गाव असल्याने अनेक ब्रिटिश लोकांनी त्यांचे घर इथे वसवले त्याबरोबर इथे अनेक बोर्डिंग स्कूलही सुरु झाल्या. इथून जवळच Lal tibba हा एक sun-set point असून तिथे मी गाडी लावून Landour कडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय अर्थात मी कधीच विसरणार नाही. साधारणतः १० किमीचा तो रस्ता जाऊन येऊन होता. तो रस्ता अथवा रस्त्याला लागून असलेली घरे किंवा झाड पाहून मला समजल हे ब्रिटिश लोकांना इथे घरासारखा का वाटायचं. ते १० किमीचा पायी प्रवास मी कधीच विसरणार नाही. रस्त्यावर मला ३-४ लोकच दिसले त्यातले दोन तर इंग्लिशच होते, इतक्या शांत ठिकाणी फक्त हवेचे आणि पक्ष्यांचे आवाज येत राहिले. Landour जितकं दिसत होतं तितकं मी ते मनामध्ये साठवत होतो. त्यानंतर मी परतीच्या प्रवासात Lal tibba इथे sun-set पाहून परत आपल्या लायब्ररी रोड वरील हॉस्टेल वर जायला निघालो. आतापर्यंत मी अनेक Hill station बघितले पण त्यामध्ये Landour पाहून मी स्तंब्ध झालो होतो. दिसायला अगदी साधं पण कित्येक पटीने सुंदर असं Landour कधी तरी तुम्हीही बघा.


आज माझी मसूरीमध्ये शेवटची रात्र होती कारण उद्या मी ऋषिकेशला जाणार होतो. तस मसूरीमध्ये अजून बघण्यासारखं भरपूर काही आहे तरी वेळेचा अभाव असल्याने आणि पुढच्या वेळेस मसूरीला येण्यासाठी काही तरी कारण हवं(असं स्वतःची समजूत घालून) उद्या ऋषिकेशला निघणार होतो.


तरी आज शेवटचा दिवस असल्याने मॉल रोड वर शेवटचे momo's खाऊन उद्याच्या सामानाची आवराआवर सुरु केली.


108 views0 comments

Recent Posts

See All

댓글


Post: Blog2_Post
bottom of page