top of page
Writer's pictureVandan Pawar

रोल मॉडेल मंडळीनो जरा सांभाळून

जेव्हा कोणी सुप्रसिद्ध व्यक्ती विशेषतः ज्यांना रोल मॉडेलचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही गुन्ह्यामध्ये अडकतात तेव्हा त्याचे बरेच परिणाम होतात. दिल्लीमध्ये छत्रसाला स्टेडीयममधे झालेले मारहाणीत सागर या उगवत्या पहिलवानचा मृत्यू झाला. यामधे दोन वेळा भारताकडून ऑलिंपिकमधे पदक मिळवणारा सुशील कुमार याला पोलिसांनी अटक केली. हा सर्व प्रकार सर्वासाठी आश्चर्यकारक आणि विचार करणारा आहे. टोकियो ऑलिंपिक काही महिन्यावर आलेले असताना ह्या वेळी असे प्रकरणामधे अडकन म्हणजे सुशील कुमारच कारकीर्द संपण्यात जमा आहे .


खरे तर कोणताही खेळ ऑलिंपिक पर्यंत खेळणे व पदक घेऊन येणे हे कठीण आहे , त्यासाठी अथक मेहनत, चिकाटी , शिस्त, त्याग ह्या गोष्टी आवश्यक असतात. पण जेव्हा असेच खेळाडू जेव्हा गंभीर गुन्ह्या मध्ये अडकतात हे चिंता वाढवणार आहे. सुशिल कुमार सारखे अनेक खेळाडू निवृत्तेचे जवळपास असताना गुन्हामधे अडकतात, जसे कि टायगर वूडस , माईक टायसन, हन्सी क्रोनए. वास्तविक पहाता सध्या भारतीय क्रिडा क्षेत्रात, उच्चतम खेळाडूना निवुर्त्तीनंतर बरेच पद उपलब्ध असतात जसे की प्रशिक्षण, समलोचना, स्वतःची अकादमी सुरु करण. पण प्रत्येक खेळाडू आपले निवृत्तीनंतर प्रेक्षक बनून खेळाचा आनंद घेऊ शकत नाही किंवा नवखे खेळाडूंना मार्गदर्शन करत नाही. उलट ते नवीन खेळाडूना वरती येवू देत नाही काही झटपट पैसे कमवन्यासाठी आपले नावाचा किवा वजनाचा वापर करुन घेतात. त्यातून Match Fixing सारखे गोष्टी सुरु झाले. सुशिल कुमारचे नेमके हेच केले. पोलिसानुसार तो आणि त्याचे साथीदार दिल्ली मधील Gangster बरोबर काम करत होते.


हे फक्त खेळामधे होत अस नाही. चित्रपट क्षेत्रामधे असे बरेच किस्से ऐकवले जातात. तत्कालीन सुपरस्टार त्याचा टाईम ओसल्यावर नैराश्यमध्ये अडकले किंवा पैशेचे अडचणीत सापडले. हे सर्व टाळण्यासाठ कोणताही व्यक्तीने आपण प्रसिध्दीचे वलयापासुन दुर जावू ते कस हॅन्डल करायच हे पहिलेच ठरवल पहिजे.


बाकी सुशिल कुमारला दोषी आढल्यास त्याला नक्कीच कठोर शिक्षा देयला हवी ज्याने करून नवीन पिढीला किंवा सुशील कुमार सारखे खेळाडूंना आदर्श मानणारे मुलांमध्ये एक संदेश जाईल

12 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2_Post
bottom of page