जगात अनेक शहरे किंवा जागा या काही emotions बरोबर जोडली गेलेली आहे. जर तुम्हाला क्रिकेट बद्दल प्रेम असेल तर वानखेडे किंवा लॉर्ड्स बद्दल तुम्हाला विशेष प्रेम असते. तेच टेनिसप्रेमींसाठी विंबल्डन बद्दल लागू आहे. आजकाल नवीन लग्न झालेले couples देशाबाहेर कुठे फिरायला जात असतील तर ते म्हणजे मालदीव.
कॉलेजकाळात जर मित्र कुठे एकत्र जाण्याची ट्रिप plan करत असतील ते म्हणजे गोवा किंवा लडाख. मित्रांनी मिळून लडाख किंवा गोवा जाण्याचा plan बरोबर बनवला नसेल तर अजूनही त्यांची मैत्री कच्ची आहे हे समजावे.
मलाही लडाखचे वेध अगदी लागले होते ते कॉलेज पासून तेही बुलेट वर. एकतर आजूबाजूमधील कधीतरी कोणी लडाखला जावून येयचे आणि लडाखबद्दल अनेक किस्से सांगायचे आणि नंतर "3 idiots", "Jab tak hai jaan" सारख्या सिनेमांनी लडाखला bucket list मध्ये सर्वात वरती नेवून ठेवले होते. त्यानंतर कॉलेज संपले, नोकऱ्या सुरु झाल्या पण लडाखला जाण्याचे हौस तशीच होती.
पुढे लडाखला जाण्याचा प्लॅन जुळून आला तो June 2023 मध्ये. लडाख पर्यटकांसाठी साधारणतः June to September सुरु असते त्यामुळे मी June मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
या लेह लडाख series मध्ये मी माझ्या प्रवासा अनुभव सांगण्याचा प्रयन्त करणार आहे.
लडाखबद्दल सांगायचे झाले तर लडाख भारताच्या उत्तरेला आहे. उत्तरेस व पूर्वेस चीन आणि पश्चिमेस पाकिस्तान सीमा असल्याने संरक्षणदृष्ट्या लडाखचे महत्व सर्वात जास्त आहे. स्थिर लोकवस्ती असलेल्या जगातील काही उंच प्रदेशांत याची लडाखची गणना होते. सिंधू नदीचे खोरे वगळता याचा बहुतेक भाग दऱ्याखोऱ्यांनी व उंच पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. लडाख पहिले जम्मू काश्मीर मध्ये मोडला जायचा नंतर article 370 मुळे लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून मान्यता मिळाली.
मी लडाख मध्ये 7 दिवस राहण्याचं प्लॅन केला त्यामध्ये मी 5 दिवसाचे एक bike tour package घेतले ज्यामध्ये आम्हाला 5 दिवस लडाख फिरवणार होते. लडाखमध्ये oxygen लेवल कमी असल्याने आणि एकंदर वातावरण वेगळे असल्याने पर्यटकांसाठी इथे रुळायला वेळ लागतो त्यामुळे मी इथे 2 दिवस पहिले जाणार होतो.
ठरल्याप्रमाणे मी 4 June ला पुणे वरून लेहला निघालो. लडाखला एक तर आपण by air किंवा by road जावू शकतो. लेहमध्ये airport असल्याने तिथे थेट विमानाने पोहचू शकतात. By road जायचे असेल तर via श्रीनगर किंवा मनाली वरून लेह पोहचू शकतात. मला भेटलेले बहुतेक पर्यटक विमानाने किंवा मनाली वरून shared cab करून आलेले भेटले. मी विमानाने पहिले पुणे ते दिल्ली नंतर lay over झाल्यावर दिल्ली ते लेह थेट गेलो. या प्रवासात अजूनही आठवतो तो लेह airport वर landing च्या पहिलेच 15 मिनिटे. लेह एअरपोर्ट हे अनेक पर्वतांच्यामध्ये असल्याने तसेच जोराचे वारे असल्याने landing साठी risky आहे. 2 वेळा लँडिंग अयशस्वी झाल्याने तिसऱ्या attempt ला safe landing झाल्यावर मला किती आनंद झाला होता तो इथे शब्दांत सांगता येणार नाही.
लेह airport मधून बाहेर आल्यावर अगदी नजर जाईल तो पर्यंत उंच उंच डोंगर आणि निळे आकाश दिसत होते. नुकतीच लेहमध्ये G20 summit होवून गेल्याने जागोजागी summit चे पोस्टर दिसले. मी book केलेली tour 2 दिवसानंतर असल्याने तोपर्यंत मी Gostop हॉस्टेल मध्ये राहणार होतो. Airport वरून हॉस्टेल ला पोहचत दुपार होवून गेलेली तरी इथे कडक थंडी लागत होती. छोटे रस्ते , विशिष्ट pattern असलेली लाकडी घरे जातांना दिसली.
कालरात्री पासून मी प्रवासात असल्याने झोप झाली न्हवती त्यामुळे मी आज आहे इथे आरामच करणार होतो.
उर्वरित लडाखची सफर भाग दोन मध्ये ..
Hozzászólások