मागील भागात सांगितल्याप्रमाणे आम्ही दैनकुंड येथे ट्रेकिंगला पोहचलो. दैनकुंड हे डलहौझी मधील सर्वात उंच शिखर असून वरती महादेवाच एक मंदिर आहे. दैनकुंड जवळच भारतीय वायुसेनेचा तळ असल्याने अपेक्षित सुरक्षा आणि काही ठिकाणी फोटो काढण्यास मनाई होती.
सकाळी 11 वाजता आम्ही चढाईला सुरवात केली. Trek तसा छोटा होता पण ठिकठिकाणी बर्फ असल्याने पायवट गुळगुळीत बनली होती आणि त्यामुळे वाटेत घसरायची शक्यता होती. त्यामुळे वरती चढायचा आमचा वेग कमीच होता. थोड्या उंचीवरून हिमालय साफ दिसत होता, त्यामुळे फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरता आला नाही. अर्ध्या तासाच्या चढाईला आम्ही 2 तास घेतले आणि आम्ही शिखरावर पोहचलो. तिथे एक छोट महादेवाच मंदिर आहे, तिथे दर्शन वैगरे घेऊन हिमालय बघत दगडावरच थोड झोपलो. खूपच सुंदर दृश्य होतं ते. ढग आमच्यापेक्षा किंचित वरतून वाहत होते अगदी डोळे तृप्त होईपर्यंत आम्ही तिथे बसलो, झोपलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
दैनकुंड Trek करून परत हॉटेलवर परतलो. त्याआधी मॉल रोडलाही थांबलो. कोणत्याही हिल स्टेशनसाठी मॉल रोड हा दागिना असतो. मॉल रोडवर गरम गरम गुलाब जामून, मॅग्गी, तंदूर चहा, मोमोस यांची दुकान प्रत्येक कोपऱ्यात सापडतात त्यामुळे ज्यांना खवाय्यासाठी मॉल रोड महत्वाचा आहे.
आज आमची डलहौझीमध्ये शेवटची रात्र आहे म्हणून रात्रीच सर्वांनी सामानाची आवारावर सुरु केली. पुढच्या दिवशी आम्ही पूर्ण दिवस खजियारमध्ये घालवून रात्री परस्पर जम्मूला निघणार होतो. सर्व आवरून रात्री डोंगराच्या कुशीत शेकोटी करून सर्व बसलो. आज डलहौझीमध्ये वावरतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आज थंडीची तीव्रता कमी जाणवत होती. Temperature तेवढंच होतं पण आज सर्व बिना दिक्कत फिरत होते. कदाचित आता शरीर डलहौझीच्या वातावरणाला अनुकूल झालं होत. आपल्या नेहमीच्या जीवनातही बदल स्वीकाराने सुरवातीला जड जाते पण थोड टिकून राहील तर नंतर त्याचीही सवय लागते.
पुढच्या दिवशी सकाळी लवकर उठून पहिले गरम पाण्याची सोय लावली. आज आम्ही खजियारला जाणार होतो. खजियार डलहौझी पासून 40 KM अंतरावर आहे. खजियारची खासियत म्हणजे या ठिकाणाला "mini switzerland" म्हटल जात. खजियारचा एक landscpae फोटो प्रसिध्द आहे तो बऱ्याच लोकांनी पाहिला असेल.
1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही खजियारला पोहचलो. तिथे अगदी सुरवातीलच या ठिकाणाला "mini switzerland" का म्हणतात याचं उत्तर मिळालं. समोर हिरव्यागार गवताने झाकलेल एक छोटंसं मैदान, मागे हिमालय पर्वतरांगा त्यामुळे कधी मी Switzerland जरी पाहिल नसल तरी येथे तसा feel येतच होता. खजियारची अजुन एक खासियत म्हणजे येथे Para-gliding, Balloon-ride, Horse-riding सारख्या activites उपलब्ध आहे. मला खजियारला येण्याची खूप इच्छा होती ती फ़क्त Para-gliding साठी. मी पहिलेही para-gliding केलं आहे पण हिमाचल प्रदेशमध्ये येऊन हिमालयात उंच उडणे याचा अनुभव वेगळाच आहे.
ठरल्याप्रमाणे आम्ही पहिले para-gliding बद्दल चौकशी करून base camp गाठला आणि जिथून हवेत झेपवतात त्या ठिकाणी म्हणजेच डोंगर चढून वरती पोहचलो. येथील start point खूप उंच असल्याने भीती वाटत होतीच पण त्यापेक्षा excitement जास्त होती. जर तुम्ही para-gliding केली असेल तर आठवत असेल पहिले 15 सेकंड खूप भीतीचे असतात त्यानंतर हवेत stable झाल्यानंतर भीती कमी होते. मलाही माझ्या jump चे पहिले 15 सेकंड अजूनही तसेच आठवतात, हेच 15 सेकंड असतात जेव्हा आयुष्याचे मोल अचानक लक्षात येत.
Para-gliding झाल्यानंतर आम्ही सर्व वळलो Horse riding कडे. मला जो घोडा भेटला त्याच नाव होत रॉकस्टार. रॉकस्टार खरंच रॉकस्टार होता. एक गोष्ट मला त्याची खूप भावली म्हणजे लांबूनही त्याला त्याच्या मालकाचा आवाज समजत होता आणि तो त्याप्रमाणे वागत होता.
खजियारला आम्हाला दुपारचे 4 वाजून गेले होते आणि आजची रात्र आमच्यासाठी महत्वाची होती. कारण आम्ही खजियार वरून थेट कुठेही मुक्काम न करता पत्नीटोप (जम्मू काश्मीर) मध्ये जाणार होतो. जम्मू काश्मीर मध्ये पहिल्यादाच मी जात असल्याने मनात प्रचंड कुतूहल होतं. प्रवासात पठाणकोटला रात्रीच्या जेवणासाठी थांबायचं आणि थेट जम्मूला पोहचयचं म्हणून खजियार पासून निघालो.
जम्मू काश्मीर बद्दल कुतूहल होतं पण हिमाचल प्रदेश मागे सोडून जातो आहे याचं दुःखही होतं. त्यामुळे पुन्हा लवकरच भेटू हे आश्वासन देत हिमाचल प्रदेश मधून रात्री 9 वाजता बाहेर पडलो आणि पठाणकोटला पोहचलो.
उर्वरित सफर भाग तीन मध्ये ..
मी आणि माझे Para-gliding चे Rider
Comments